Infertility Awareness

वंध्यत्वावरील उपचार पद्धती : - सर्वप्रथम विलंब न करता वेळीच तज्ञ डॉक्टरांकडे उपचारास सुरुवात करावी. संकोच न बाळगता डॉक्टरांना आपल्या वैवाहिक कामजीवनाविषयी संपूर्ण माहिती द्यावी, ज्यायोगे डॉक्टरांनी केलेले उपचार आपल्या फायद्याचे ठरतील. - डॉक्टरी सल्ल्यानुसार, विनाविलंब वैद्यकीय तपासण्या कराव्यात. - सोनोग्राफीद्वारे बीजकोशाची तपासणी करून गरज असल्यास औषधोपचाराद्वारे गर्भधारणेसाठी सुयोग्य असे स्त्रीबीज तयार केले जाते. - लॅप्रोस्कोपीमध्ये बेंबीजवळ एक सूक्ष्म छिद्र पाडून दुर्बिण यंत्राच्या मदतीने गर्भनलिकेची तपासणी करतात या तपासणीमध्ये जननेंद्रियातील असलेले रोग अथवा अडचणी अत्यंत सूक्ष्मपणे तपासल्या जातात व गरज असल्यास तत्काळ योग्य ते उपचार करून जननेंद्रियातलेतले दोष दूर केले जातात. - हिस्ट्रोस्कोपीद्वारे गर्भाशयाच्या आतील भागाचे परीक्षण करून, वैद्यकीय उपकरणाने खरवडून आतील स्तराचा भाग तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवला जातो .या तपासणीमुळे स्त्री बीज निर्मितीच्या अडचणी , गर्भाशयाला काही संसर्ग झाला आहे का इत्यादी गोष्टींचे निदान करता येते व त्या अनुषंगाने पुढील उपचार पद्धती ठरवली जाते आययूआय (IUI) उपचारामध्ये स्त्रीला पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून गोळ्या / इंजेक्शन देऊन अंडाशयात चांगल्या प्रतीची अंडी बनवली जातात व त्या अंड्यांची फॉलिक्युलर स्टडी करून ते सक्षम अंडे फलनासाठी तयार झाल्यावर गर्भपिशवीच्या आतमध्ये पतीचे वीर्य सोडतात. ह्या पद्धतीत पतीच्या वीर्याचे सॅम्पल घेउन त्यावर प्रक्रिया करून त्यातील उच्च दर्जाचे, वेगवान शुक्राणू कॅथेटरच्या माध्यमातून गर्भपिशवीत सोडले जातात. IUI ही उपचार प्रणाली किती वेळा करावी, याला काही वैद्यकीय मर्यादा आहेत आणि या प्रणालीचा यशस्वी होण्याची टक्केवारी 15 ते 20 टक्के आहे. जर ही उपचार प्रणाली यशस्वी झाली नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील अत्यानुधिक उपचार पद्धतीचा अवलंब करावा. वंध्यत्व असलेल्या केवळ स्त्रियांचेच नव्हे; तर जोडप्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. ही त्या जोडप्याची व काळाची गरज आहे. समुपदेशन हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते हे विसरता कामा नये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपचारांदरम्यान आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवून स्वतः संयम बाळगावा व डॉक्टरांना सहकार्य करावे.

3 Likes

LikeAnswersShare
Dear Dr.Nitin Goje, If your article will be in hindi or english the mass can understand easily. Because this app is nation wide.
@#cap Admin Ayurveda